Friday 1 July 2016

अलिखित करार



अलिखित करार

तुझ्या माझ्यात झालेला एक अलिखित करार,
सावरायचे, आवरायचे जबाबदारी दोघांची

पण तरीही तुलाच समजुन घ्यावं लागेल,
 कारण शेवटी तुच आहेस द्याशील, क्षमाशील आणि बरोबरीने एक आई

कितीही झालं तरी उंबरठा ओंलाडायचा नाही
आणि दिलेला शब्द तर त्याहुन कधी मोडायचा नाही

फाटले, तुटले तरी चालेल,
पण तोडण्याच्या वेळेपर्यत न्यायचे नाही
आणि गेलेच तरी दुसर्‍याने अगदीच तेव्हा ते ओढायचे नाही

काय होईल तेव्हा तु ही आहेस समर्थ, मीही कर्तत्त्वान,
तरीही गरज एकमेकांची होती म्हणुनच मागितली होती ना....एकमेकांना साथ, 

आता असे काय झाले ? की, एकमेकांना अगदी पाहणे देखील असह्य झाले,
कदाचित झाले काहीच नाही, पण कराराचे काही नियम मात्र समजुन घ्यायचेच राहिले.
-: कृष्णाई :-

No comments:

Post a Comment